कोरडी सहानुभूती दाखवणारे, रूग्णाची दिशाभूल करून त्यांना लुटणारे अन् आपल्या व्यवसायाला काळीमा लावणारे अनेक डाॅक्टर्स असतीलही पण मी सुदैवी. कारण मला सर्वश्री डाॅ. सागर (प्रद्यूम्न) ओक, डाॅ. मनीष शर्मा, डाॅ. मिलींद फडके आणि डाॅ. अरविंद काटे हे देवदूत भेटले. शक्यतो कुणालाही वारंवार डाॅक्टरकडे जाण्याची वेळ न येवो, पण आलीच तर असेच डाॅक्टर्स भेटोत हीच इच्छा.